Aavdel Tethe Pravas Yojana 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (MSRTC) अंतर्गत “Aavdel Tethe Pravas Yojana” जाहीर करण्यात आलेली असून या योजने अंतर्गत तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही फिरू शकता तेही फक्त ११०० रुपयांमध्ये, महाराष्ट्र सरकार हि योजना सन १९८८ पासून राबवत आहे. या योजने अंतर्गत ७ दिवसाच्या पासाप्रमाणे ४ दिवसांचा पास दिला जातो तर लाभार्त्यानी आमच्या वेबसाईट वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून वरील योजनेसाठी लागणारे कागदपत्रे , अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्यासाठी ची ऑफिसिअल वेबसाईट इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन योजने साठी अर्ज करावा

आम्ही आमच्या वेबसाईट वर अश्याच प्रकारच्या विविध सरकारी योजनांची माहिती प्रदर्शित करत असतो आमच्या वेबसाईट वरील माहिती इतर गरजू लोकांपर्यंत नक्की पोहचवा जेणे करून त्यांना हि या योजनेचा लाभ घेता येईल या योजने बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे
Aavdel Tethe Pravas Yojana 2023 : संपूर्ण माहिती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (MSRTC) आपला महसूल वाढवण्यासाठी अश्या प्रकारच्या योजना राबवत असते तसेच महाराष्ट्र सरकार सुद्धा एसटी विभागाचा महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते यावेळी MSRTC ने दहा दिवसांसाठी एसटी चा पास देत Aavdel Tethe Pravas या योजनेची सुरुवात केली आहे. सन २००६ साली एप्रिल महिन्यामध्ये या योजनेची पुनरचना करून १० दिवसांचा पास चा कालावधी बदलून ४ आणि ७ दिवस असा करण्यात आला
या पास ची वैधता शहर वाहतुकीसोबत राज्यामध्ये सर्वत्र ठिकाणी उपलब्ध आहे प्रवाशांना पास चे आरक्षण (Reservation) करून घेण्याची परवानगी आहे या योजनेसाठी ठरवण्यात आलेल्या ४ आणि ७ दिवसाच्या पास चे शुल्क वेगवेगळे आहेत, या आधी राबवण्यात आलेल्या “Aavdel Tethe Pravas” या योजने अंतर्गत ४ आणि ७ दिवसाचे २ हंगाम काढण्यात आले होते त्यामध्ये एक कमी गर्दी आणि दुसरा गर्दी चा हंगाम असे २ हंगाम होते परंतु यावेळी महाराष्ट्र सरकारने हि योजना वर्षभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे
या योजने मध्ये प्रवाश्याना एसटी ची साधी सेवा, रात्रीची सेवा, जलद सेवा, हिरकणी, शिवशाही अश्या वेगवेगळ्या बस ची निवड करण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय खूप यशस्वी ठरलेला आहे या योजने अंतर्गत राज्यातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे पाहण्यासाठी प्रवासी या पास चा जास्तीत जास्त वापर करून घेत आहेत तसेच हि योजना वर्षभर असली तरीही उन्हाळा हिवाळा आणि मुख्य म्हणजे लग्नसराईत या योज़नेला चांगला प्रतिसाद मिळत आहे
Aavdel Tethe Pravas Yojana : शुल्क आणि इतर बाबी
या योजने मध्ये महाराष्ट्र परिवहन मार्ग महामंडळ यांनी या पास साठी काही शुल्क आकारले आहेत ते खालीलप्रमाणे
- ७ Days Pass Fees (७ दिवसांच्या पासचे शुल्क)
वाहतूक सेवेचा प्रकार | प्रौढ | मुले |
साधी, जलद, रात्र सेवा, शहरी यशवंती (मिडी) अंतरराज्यासह | २०४० रुपये | १०२५ रुपये |
शिवशाही (आसनी) आंतरराज्यासह | ३०३० रुपये | १५२० रुपये |
- ४ Days Pass Fees (४ दिवसांच्या पासचे शुल्क)
वाहतूक सेवेचा प्रकार | प्रौढ | मुले |
साधी, जलद, रात्र सेवा, शहरी यशवंती (मिडी) अंतरराज्यासह | ११७० रुपये | ५८५ रुपये |
शिवशाही (आसनी) आंतरराज्यासह | १५२० रुपये | ७६५ रुपये |
Aavdel Tethe Pravas : या योजनेचे नियम व अटी
- Aavdel Tethe Pravas या योजने अंतर्गत ४ आणि ७ दिवसांचा पास दिला जाईल.
- साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बस साठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवन्ती (मिडी) अश्या विविध बस साठी असेल आणि आंतरराज्य मार्गासह ग्राह्य धरला जाईल.
- शिवशाही बस साठी वेगळे पास ठरवण्यात आलेले आहेत.
- निमआराम बस साठी स्वतंत्र दार निश्चित करण्यात आलेले नाहीत, शिवशाही बस साठी देण्यात येणारा पास शिवशाही बस सह साधी, निमआराम, वीणावातानुकूलित शयन आणि या सर्व सेवांसाठी आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहील
- या योजनेत पास घेण्यासाठी लाभार्थ्यांना आरक्षण करून ठेवता येईल.
- आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत पास काढणाऱ्या लाभार्थ्यांना (प्रौढ लाभार्थ्यांना 30 किलो आणि बारा वर्षाखालील मुलांना 15 किलो वजन घेऊन जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे जास्तीचे शुल्क आकारले जाणार नाही)
- या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदर दिले जातील
- आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेअंतर्गत काढलेले पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेस मध्येच तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बस मध्ये सुद्धा ग्राह्य धरले जातील
- महाराष्ट्र राज्य महा परिवहन मार्ग मंडळ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या योजनेचे पास ज्यांच्याकडे आहेत त्यांना प्रवेश नाकारू नये
- आवडेल तेथे प्रवास पासधारकांसाठी बसमधील आसनासाठी हमी देता येणार नाही परंतु या योजनेतील पाच धारकांना सदर पावसावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल.
- पास धारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जीथ पर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसणे प्रवास करता येईल
- पास हरवल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही व हरवलेल्या पासाचा कोणत्याही प्रकारचा परतावा दिला जाणार नाही.
- सदरचा पास अहस्तांतरणीय राहील
- पाचचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल
- प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेणार नाही
- आवडेल तेथे कोठे ही प्रवास पाच योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना करण्यात येईल पावसाच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पास वर २४.०० वा. प्रवास करत असेल तर ग्रुप पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक असेल
- संप/काम बंद आंदोलन यामुळे राज्य परिवहन वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी सदर पासावर प्रवास करू न शकल्यास त्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा/ मुदतवाढ देण्यात येईल
- सदरची मुदतवाढ परतावा वाहतूक सुरु झाल्यापासून ३ महिने पर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल
- स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील
Required Documents For Aavdel Tethe Pravas Yojana
- विहित नमुन्यातील अर्ज
- २ passport size photo (पासपोर्ट फोटो)
- पासचे मूल्य (शुल्क)
आमच्या बद्दल थोडक्यात माहिती (योजनाकेंद्र.कॉम)
नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या योजना केंद्र या वेबसाईट वर महाराष्ट्र शासनाद्वारे निघणाऱ्या विविध योजना ज्यामध्ये शेती योजना, सरकारी योजना, खाजगी योजना, आवास योजना, केंद्र शासन योजना, अशा विविध योजनांची माहिती आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जेणेकरून तुम्हाला त्या योजनांचा लाभ घेता येईल
आपणास विनंती आहे की तुम्ही आमच्या वेबसाईटवरील माहिती इतर गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईट नोटिफिकेशन ला चालू करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही आमच्या वेबसाईटवर आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
FAQ : लाभार्थ्यांच्या मनातील प्रश्न
आवडेल तेथे प्रवास या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
आवडेल तेथे प्रवास ही योजना महाराष्ट्र राज्य मार्ग महा परिवहन मंडळ यांच्या अंतर्गत राबविण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला चार ते सात दिवस कालावधीचा पास मिळतो
आवडेल तेथे प्रवास ही योजना नेमकी काय आहे ?
आवडेल तेथे प्रवास ही योजना महाराष्ट्र राज्य महा परिवहन मंडळ यांच्या अंतर्गत राबविण्यात आलेली असून या योजनेमध्ये तुम्हाला चार ते सात दिवस कालावधीचा पास मिळतो या पासचा वापर करून तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही फिरू शकता
आवडेल तेथे प्रवास ही योजना किती दिवसांची आहे ?
आवडेल तेथे प्रवास ही योजना महाराष्ट्र शासन यावर्षी पूर्ण वर्षभर राबवणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ नक्की घ्यावा
Table of Contents