CMEGP 2023 (Chief Minister Employment Generation Programme 2023) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना नक्की काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत
आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक अनेक तरुणांना स्वतःचा व्यवसाय करून स्वतः च्या पायावर उभे राहण्याची इच्छा असते परंतु व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवलासोबत अनेक गोष्टींची गरज असते बरोबर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या हेतूने राज्य सरकार विविध योजना राबवत असते या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा याच प्रयत्नामध्ये सरकार असते, राज्यातील तरुणांनी नोकरी शोधण्यापेक्षा व्यवसायाकडे यावे आणि स्वतः चा उद्योग उभारून स्वावलंबी व्हावे आणि त्याच बरोबर इतर गरजूंसाठी रोजगार निर्मित करावे या साठीच महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP 2023) सुरु केली आहे

तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या योजनेची संबंधित सर्व माहिती देणार आहोत या पोस्ट मध्ये तुम्हाला हि योजना नेमकी काय आहे, या योजनेचे उद्दिष्ट, योजनेचा लाभ, योजनेची वैशिष्ट्ये, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा आहे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे
आम्ही आमच्या वेबसाईट वर अश्याच प्रकारच्या विविध सरकारी योजनांची माहिती प्रदर्शित करत असतो आमच्या वेबसाईट वरील माहिती इतर गरजू लोकांपर्यंत नक्की पोहचवा जेणे करून त्यांना हि या योजनेचा लाभ घेता येईल या योजने बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना संपूर्ण माहिती : CMEGP 2023
महाराष्ट्र राज्यातील तरुणांनी जर स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर राज्यातील इतर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील तरुणांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्यातील तरुणांच्या उदोजकतेला वाव देण्यासाठी शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे या योजनेमुळे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या स्थापनेद्वारे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील या प्रकल्पांचा खर्च ५० लाखांपर्यंत मर्यादित असेल
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या प्रशासकीय नियंत्रण अंतर्गत उद्योग संचालनामार्फत या योजनेची निरीक्षण आणि अंमलबजावणी केली जाईल त्याचप्रमाणे या योजनेची अंमलबजावणी जिल्हा उद्योग केंद्र DIC आणि महाराष्ट्र खादि ग्राम उद्योग बोर्ड यांच्या नियंत्रणाखाली देखील करण्यात येणार आहे
योजनेचे नावं | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकारने |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी कोण असणार | महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण |
उद्देश | महाराष्ट्रातील तरुणांना उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक साहाय्य करणे |
विभाग | उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
या योजने अंतर्गत राबवले जाणारे उद्योग खालील प्रमाणे आहे : CMEGP 2023
- सेवा आधारित
- कृषी आधारित
- प्राथमिक कृषी आधारित
- इतर व्यवसाय
- सिंगल ब्रँड सेवा उपक्रम क्षेत्रातील उद्योग
- मोबाईल सेवा उपक्रम
या योजनेसंदर्भात असणाऱ्या वित्तीय संस्था
- सार्वजनिक क्षेत्रातील बँक
- राज्यातील सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका
- खाजगी क्षेत्रातील अनुसूचित व्यवसायिक बँका
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष : CMEGP 2023
- राज्यातील 18 ते 45 वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते (विशेष श्रेणीसाठी वय पाच वर्षांनी शिथिल राहील)
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, महाराष्ट्र बाहेर जन्म झाल्यास अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
- आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी पात्र होण्यासाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा असणार नाही
- अर्जदाराने संबंधित अधिकाऱ्याकडे नोंदणीकृत असलेले मालकी भागीदारी आणि स्वयंसहायता या योजनेअंतर्गत नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी पात्र आहेत
- दहा लाख ते पंचवीस लाख पर्यंतच्या उद्योगांसाठी शैक्षणिक पात्रता निकष अर्जदार हा किमान सातवी पास पात्र असणे आवश्यक आहे, तसेच 25 लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या उद्योगासाठी अर्जदाराची शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराकडे प्रकल्पासाठी संबंधित कौशल्य असणे आवश्यक आहे
- या योजनेअंतर्गत कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल
- योजनेअंतर्गत सहाय्य फक्त नवीन उद्योगांसाठी उपलब्ध आहे
- या योजनेच्या अंतर्गत ज्या उद्योगांनी आधीच भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या सबसिडी लिंक योजनेचा किंवा शासनाच्या इतर कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ मिळवला आहे ते उद्योग या योजनेसाठी पात्र ठरणार नाही
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- आदिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता तपशील
- उपक्रम फॉर्म
- प्रकल्प अहवाल
- जातीचे प्रमाणपत्र
- कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज कसा करायचा
- तुम्हाला सर्वप्रथम CMEGP च्या ऑफिसिअल वेबसाईट वर जावे लागेल
- वेबसाईटचे होम पेज उघडल्यानंतर तुम्हाला तेथे वैयक्तिक व्यक्तीसाठी ऑनलाईन अर्ज या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे
- यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल तो तुम्हाला संपूर्ण भरायचा आहे
- फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत
- कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला सेव या बटनावर क्लिक करायचे आहे
- वरील पद्धती वरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता
हे सुद्धा पाहा – स्वाधार योजना संपूर्ण माहिती
Important Links For CMEGP 2023 : महत्वाच्या लिंक्स
शासनाचा GR वाचा | GR साठी येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
योजना संपर्क यादी | येथे क्लिक करा |
Table of Contents